दिनांक 14-11-2021 रविवार रोजी श्री. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले वसतिगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या अर्धा कृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून नियोजन आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. रावसाहेब कसबे सर, तर अध्यक्ष म्हणून मा. श्री. प्रा. हरी नरके सर उपस्थित होते. यावेळी दोन्ही विचारवंतांनी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी विचार पिठावर संस्था अध्यक्ष मा. डॉ. श्री. सुरेशजी खुरसाळे सर, सचिव मा. श्री. गणपतजी व्यास सर, प्राचार्य श्री. आबासाहेब देशमुख सर, प्राचार्य श्री. अरूण दळवी सर, मा. डॉ. कुलकर्णी, प्रा. डॉ. वाल्मिकराव सरवदे सर, डॉ. राम गोटे सर उपस्थित होते. यावेळी वसतिगृह बांधकामातील इंजिनिअर, गुत्तेदार, सुतार, इलेक्ट्रेशियन , सर्व कामगार यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील मान्यवर नागरिक, संस्थेचे सर्व प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, व इतर विभागातील कर्मचारी बंधू – भगिनी उपस्थित होते.