अंबाजोगाई  येथील प्रसिद्ध वकिल व जेष्ठ साहित्यीक अॅड.रा. स. नाना उर्फ रामराव सदाशिव देशपांडे (वय९५) यांचे शुक्रवारी( दि.८) सकाळी साडेदहाच्या सुमारास वृध्दापकाळामुळे निधन झाले.  त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
(कै.) अॅड. देशपांडे हे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष होते.त्यांनी काही वर्ष संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळली. कुरुंदकर स्मृती साहित्य मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी पाच वर्ष भुषविले. प्रतिभाशाली कवी म्हूणून ते परिचित होते.
 अॅड. देशपांडे यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
अंबाजोगाई ( प्रतिनिधी) येथील जेष्ठ साहित्यीक व प्रसिद्ध वकिल(कै.)अॅड. रा. स. देशपांडे यांच्या पार्थिवावर शनिवारी ( दि.९) बोरूळ तलाव स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी(कै.) पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मराठवाडा साहित्य परिषदेचे स्थानिक सचिव दगडू लोमटे, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, कॉम्रेड अजय बुरांडे, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. शरद लोमटे, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, वशिष्ट आर्य, श्री. कात्नेश्वरकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली. त्यामुळे अॅड. देशपांडे यांच्या जुन्या कार्याला उजाळा मिळाला. कॉम्रेड अजय बुरांडे म्हणाले , कष्टकरी , शेतकरी व शेतमजूरांची प्रकरणे अॅड . देशपांडे यांनी न्यायालयात मोफत लढविली. राजकिशोर मोदी म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम अॅड . देशपांडे यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव दगडू लोमटे म्हणाले , नानांच्या प्रभावी कविता आहेत . साहित्य क्षेत्रात त्यांची उत्तम कामगिरी होती .
वकिल संघाचे अध्यक्ष अॅड . शरद लोमटे म्हणाले , गोवा व महाराष्ट्र वकील संघाचा मानाचा पुरस्कार नानांना मिळाला होता . त्यांनी अनेक वकिलांना कायद्याचे मार्गदर्शन केले. जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले, नानांची स्मरणशक्ती मोठी होती . त्यांच्या ज्ञान संपादनातून त्यांनी अनेकांना न्याय मिळऊन दिला .
वाशिष्ट आर्य म्हणाले, नाना गोरगरीब जनतेचे कैवारी होते . त्यांनी अनेकांना कायदेशीर मार्गदर्शन केले. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नरहर कुरुंदकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाले म्हणाले, योगेश्वरी नुतन विालयातील दहावीच्या पहिल्या बॅचचे नाना विद्यार्थी होते . वकिलीत ते पारांगत होते . साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे . योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विकासात त्यांनी मोलाचे कार्य केले . संस्थेचे सचिव आणि सर्वसाधारण सभेचे ते उपाध्यक्ष राहिले . त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे. श्री . कालेश्वरकर यांनी ही श्रध्दांजली वाहिली . यावेळी सूत्रसंचलन शिवकुमार निर्मळे यांनी केले .