योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीक कचरा वेचून मोठा ढीग तयार केला. यावेळी मुख्याध्यापिका सौ . कुंदा व्यास, पर्यवेक्षक एस. के. निर्मळे, क्रीडा शिक्षक आर .व्ही . सोनवळकर, नाईक एस .एस. कोळी, ज्ञानेश्वर मोरपल्ले , जाधव , मेनकुदळे व विद्यार्थी उपस्थित होते .
       यावेळी श्री .निर्मळे यांनी विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे महत्व सांगितले .कचऱ्यामुळे आरोग्य बिघडते . त्यामुळे आपल्या परिसरातील कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. त्यानंतर नगर परिषद कार्यालयात दूरध्वनी करून कचरा नेण्याची विनंती करण्यात आली .