;श्री. योगेश्वरी शिक्षण  संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त योगेश्वरी महाविद्यालयात रविवार दि 10 डिसेंबर 2017 रोजी 12 वा नागापूरकर सभागृहात डॉं दत्तात्रय सावंत , विभाग प्रमूख – वोखार्ड लिमिटेड , चिकलठाणा –  औरंगाबाद यांचे “वनौषधी संगोपन व संवर्धनातून स्वयंरोजगार निर्मिती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन  करण्यात आले होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे  गार्गदर्शक मा चंद्रशेखर बर्दापूरकर हे होते . कार्यक्रमाध्यक्ष मा चंद्रशेखर बर्दापूरकर व संस्थाध्यक्ष मा डॉ खुरसाळे  यांचे स्वागत उपप्राचार्य पी. के.कऱ्हाड  यांनी केले. मा बर्दापूरकर यांच्या हस्ते डॉ सावंत यांचा  सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे हे विचारमंचावर उपस्थित होते. सहसचिव गणपत व्यास यांनी रचलेल्या संस्थागिताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली व्याख्याते डॉ. सावंत यांनी सफेद मुसळी, दुधी,गोखरू, कुर्डू ,कोरफड ,अश्वगंधा ,गुग्गुळ ,शतावरी आदी औषधी वनस्पतींची माहिती देउन त्यांची लागवड कशी करावी ,त्यांचे औषधी मूल्य ,बाजारपेठ,मागणी आणि व्यवसायाच्या संधी यावर मार्गदर्शन केले . मा बर्दापूरकर यांनी अध्वक्षीय  समारोपातून विद्यार्थांनी केवळ पारंपारिक पदधतीने नौकरीच्या मागे न लागता नवी आ०हाने स्विकारावीत व उद्योजक व्हावे असे आवाहन केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे हे विचारमंचावर उपस्थित हेाते. या प्रसंगी संस्येचे उपाध्यक्ष अंड. शिवाजीराव कऱ्हाड,मा. अँड .०हीं. के .चौसाळकर यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व पक्षाधिकारी प्रा गोळेगावकर,गणपत व्यास अँड कमलाकरराव चौसाळकर,प्रा. माणिकराव लोमटे,डॉ शांतीनाथ  बनसोडे,बेलुर्गीकर हे उपास्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ आर व्ही कुलकर्णी यानी केले.या प्रसंगी निमंत्रीत,     संर्स्थेतिल  शाळा व महाविद्यालयाचे विभाग प्रमूख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मयारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपास्थित होते.