योगेश्वरी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी मा.सौ.ज्योती परदेशी..
कै.दे बा. गणगे योगेश्वरी नुतन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी ज्योती किशोर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचीव अॅड.कामखेडकर यांनी ज्योती किशोर परदेशी यांना मुख्याध्यापकपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे. यापुर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले लंकेश वैद्य हे दि. ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्योती किशोर परदेशी या विद्यालयात मागील ३० वर्षापासून सहशिक्षक पदावर कार्यरत असून शिक्षणासोबतच त्यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे काम आहे. ज्योती किशोर परदेशी या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. विमलताई मुंदडा यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात. त्यांनी बीड जिल्हा नियोजन समिती, अंबाजोगाई तालुका रोजगार हमी योजना समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातुन तालुक्यातील अनेक वृध्दांना व वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर(२००१-२) पुरस्कार देवून गौरव केला आहे.
सदरील नियुक्तीबद्दल ज्योती परदेशी यांचे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले,  योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक अँड. शिवाजीराव कराड,एस एन.जोशी,प्रा.एस.के.जोगदंड, शिरीष बेलुर्गीकर, मुख्याध्यापक श्री. लंकेश वैद्य सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा आहेत.