योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त आजी-माजी कर्मचारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे निवृत्त प्राचार्य डॉ.के.एच.पुरोहित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त गट शिक्षणाधिकारी एस.एन. जोशी व प्रा.डॉ. सुरेश फुले उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले, अॅड.शिवाजीराव कराड,अॅड.यु.बी. कामखेडकर उपस्थित होते. प्रा.डॉ.फुले म्हणाले, जगात सर्वात मौल्यवान बौद्धिक संपत्ती महत्वाची आहे.
मराठवाडयाचे शैक्षणिक केंद्र म्हूणून या संस्थेकडे पाहिले जाते. त्यागी व जेष्ठ संस्थाचालकांची परंपरा येथे लाभली आहे. श्री एस.एन. जोशी म्हणाले, शिक्षकांना समाजात आदराचे स्थान आहे. त्यामुळे शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी. कष्टाळू कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची प्रगती होते. शताब्दी वर्षानिमित्त संस्थेने अनेक सर्वस्पर्शी कार्यक्रम घेतले.
      अध्यक्षीय समारोप करताना निवृत्त प्राचार्य पुरोहित म्हणाले, आजी -माजी कर्मचारी मेळावा आपण कोठेही पाहिला नाही. या संस्येने या मेळाव्यातून जुन्या व नवीन पिढीची भेट घडउन आणली. या पुढे संस्थेने विविध विषयात संशोधक व मार्गदर्शक घडवावेत. संस्थेचा विकास करावा.
    यावेळी बालाजी मुंडे, प्रा. श्रीरंग सुरवसे, सय्यद पार्शमयॉ, निवृत्त मुख्याध्यापिका रविबाला देशपांडे, प्रा. नानासाहेब गाठाळ, प्रा.प्रमोदिनी शहाणे
यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
    सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले यांनी आपल्या प्रास्ताविकांत लोकाधारावर संस्थेच्या विकास झाल्याचे सांगितले. पाहुण्यांचे स्वागत अॅड. शिवाजीराव कराड, गणपत व्यास, प्रा.एस.के. जोगदंड, मेजर डॉ. शांतीनाथ बनसोडे, एस.के. बेलुर्गीकर, प्रा.गोळेगावकर, प्रा.माणिकराव लोमटे
यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा बर्दापूरे व प्राची गोस्वामी यांनी केले. शेवटी अॅड. यु.बी. कामखेडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
     त्यानंतर सामुहिक भोजन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.